भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. आता या प्रचारात त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असुन भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या पुढाकाराने ठाणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नेते व पदाधिकारी कार्यकर्तेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

भिवंडी तालुक्यातील कशेळी गांव मैदानावर झालेल्या संवाद मेळाव्यास विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव किरण पावसकर,
ज्योती वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.प्रसंगी आमदार शांताराम मोरे,ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील,पालघर संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, राजन साप्ते,तालुका प्रमुख इंद्रपाल तरे,अरुण पाटील,कशेळी ग्रामपंचायत सरपंच वैशाली थळे,माजी सरपंच पळजू बाई थळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.बाळासाहेब ठाकरे हे समान नागरी कायद्यासाठी आग्रही होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा कायदा केला.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात समान नागरी कायद्यास विरोध दर्शवला आहे.त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असल्याने बाळासाहेबांचा अपमान उद्धव ठाकरे करत असल्याची टिका शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी या वेळी केली.शिवसेना भाजपा 1995 पासून एकत्रित निवडणुका लढत आली आहे.परंतु काही काम होत नसल्याने काही पदाधिकारी शिवसैनिक दुखावलेले आहेत परंतु मतभेदातून मन भेद होऊ नये असे आवाहन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले.शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांची समजूत काढून दुर करतील त्यामुळे सर्वानी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी केले. आहे. महायुतीच्या मागील दोन निवडणुकीत कपिल पाटील यांच्या प्रचाराची सुरवात कशेळी येथून केली आणि विजयश्री मिळवली या निवडणुकीत आदेश पळणारे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करून युतीचा धर्म पालन करून कपिल पाटील यांना संपूर्ण ताकदीने मदत करतील अशी माहिती जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी दिली.भाजपाचे कपिल पाटील हॅट्रिक साधणार असा विश्वास ही शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.