भिवंडीतील पडघा-बोरीवली गावात एटीएस पथकाची छापा कारवाई…

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी ) 
भिवंडी तालुक्यातील पडघा गांव जवळील बोरीवली गावात मध्यरात्रीपासून ईडी,आयकर विभाग आणि एटीएस पथकाची संयुक्त छापेमारी सुरू केली आहे.त्यामुळे भितीचे वातावरण पसरले असुन परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी गंभीर दखल घेऊन विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे.दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने गावातील अनेक निवासी घरांवर ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे.ही कारवाई सुरू असताना गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गावाबाहेरील मैदानात या कारवाई मध्ये सहभागी वीस हून अधिक कार (गाडी) चा ताफा उभा आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पडघा – बोरीवली ,


पुणे,मालेगाव यांसह महाराष्ट्रातील सुमारे 35 ठिकाणी सर्च ऑपरेशन मोहीम पोलीस पथकाकडून राबवली जात आहे.ISIS टेरर मॉड्यूलशी संबंधित संशयित आर्थिक हालचालींच्या तपासात ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.एन.आय.ए ने दाखल केलेल्या प्रकरणाच्या आधारे ईडीने अलीकडेच ECIR नोंदवला असून, हा तपास साकिब नाचन प्रकरणाशी जोडला गेला आहे.28 जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या साकिब नाचनच्या दफनविधी नंतर एटीएसची ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.एटीएस सह ईडी व आयकर विभागाने संयुक्त ऑपरेशनल ग्रिड तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बोरवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून संपूर्ण गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले असुन सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल आहे तसेच पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *