भिवंडीत जायट्स ग्रुप तर्फे महिलांनी काढली जनजागृती मोटरसायकल रॅली..

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी,
सहेली जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी व युथ या ग्रुप संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अवयव दान करा पाणी बचत व बेटी बचाव अशा विविध लोक उपयोगी व पर्यावरण संरक्षण बाबत जनजागृती करण्यासाठी महिलांनीचेवतीने मोटरसायकल रॅली आज सकाळी काढण्यात आली होती.300हुन अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोटर बाईक रॅलीचा शुभारंभ ग्रुपचे जेष्ठ माजी अध्यक्ष अँड. गगन जैन यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवित सुरवात झाली. वंजारपट्टी नाका,कल्याण रोड जकात नाका,धामणकर नाका, गौरीपाडा, टिळक चौक मार्गे ही रॅली चाचा नेहरू हिंदी हायस्कूल येथे समाप्त झाली यावेळी उपस्थित मान्यवर महिलांचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.जायंट्स ग्रुप सहेली मेट्रोचे प्रमुख मनिषा भांगरे,पुनम केणी,पूजा थळे,काजल जंजयनी, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व सायकल पटू निता बोरसे,योग प्रशिक्षक वैजंती जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.अवयवदान,बेटी बचाओ,झाड वाचवा,पाणी वाचवा व प्राणी वाचवा  विविध जनजागृती करणारे फलक यावेळी लाऊन यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *