भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून गावठी दारू विक्री व वाहतूक केली जात आहे आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी होणाऱ्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून तालुक्यातील आलिमघर येथील एका घराचे खोलीत छापा कारवाई करीत सुमारे एक लाख 11 हजार रुपये किंमतीची 1100 लिटर हातभट्टी दारू मुद्दे मालासह जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील केवणी खाडी किनारी मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्याचे गंभीर प्रकार होत असतात.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे बेकायदेशीरपणे चालणारे दारूचे अड्डे नष्ट करणे अपेक्षित आहे मात्र संबंधित विभाग हे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गावठी दारू तयार करून दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे प्रकार वारंवार उघड होत आहेत, पोलीस वेळोवेळी छापा कारवाई करून हजारो लिटर दारू तयार करण्याचे हातभट्टी नष्ट करीत करून गुन्हे दाखल करीत आरोपींना अटक करीत असतात मात्र आजही भिवंडी परिसरात गावठी दारू मोठ्या प्रमाणात तयार करून त्याची वाहतूक करून विक्री करत असल्याचे प्रकार पोलीस उघडकीस आणत आहेत.भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी किशोर थोरात यांना माहिती मिळाली कि भिवंडी तालुक्यातील
आलिमघर येथील रूपेश नारायण पाटील यांच्या राहते घराचे शेजारी मोठ्या प्रमाणात हातभट्टीचा तयार दारूचा साठा आहे.त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन भोईर,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव,रविंद्र बी. पाटील, पोह किशोर थोरात,प्रकाश पाटील, शशिकांत यादव,निलेश बोरसे सर्फराज तडवी या पथकाने रूपेश नारायण पाटील (वय ३५ वर्षे) यांच्या आलिमघर येथील याचे राहते घराचे शेजारी खोलीमध्ये छापा कारवाई करीत सुमारे एक लाख 11 हजार 500 रुपये किमंतीची एक हजार 115 लिटर हातभट्टीची तयार दारू मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी सदर आरोपी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव,
सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

