मैदानी खेळामुळे युवकवर्ग व्यसना
पासून परावृत्त होतात – आ.रवींद्र चव्हाण
भिवंडी (भानुदास भसाळे ) शालेय विद्यार्थ्यांसह युवकांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी आमदार महेश चौघुले यांनी भिवंडीत प्रथमच भव्य दिव्य अशी ऑलिंपिक स्पर्धाचे आयोजन करून खेळाडू विद्यार्थी व युवकांसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे.ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे प्रत्येक जिल्ह्यात,शहरात व ग्रामीण भागात युवकांसाठी मैदानी खेळ आवश्यक आहे,खेळ स्पर्धेमुळे युवक वर्ग व्यसना पासून परावृत्त होतो असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश चौघुले यांनी शालेय विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील स्व.परशुराम टावरे क्रीडा स्टेडियम
मैदानात विविध खेळांचा समावेश करून ऑलम्पिक स्पर्धो – 2025 आयोजित केले असून या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी भाजपाचे नेते आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी यावेळी महापालिकेचे माजी गटनेते निलेश चौधरी,
भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील,माजी नगरसेवक प्रकाश टावरे,संतोष शेट्टी,मनीषा भांगरे यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,यावेळी फायर शोव्दारे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

कापड उद्योगाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीत प्रथमच खेळाडू युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑलम्पिक स्पर्धाची सुरुवात झाली आहे.ही कौतुकास्पद बाब आहे मैदानी खेळामुळे खेळाडू युवकांमध्ये चेतना निर्माण होते युवक व्यसनापासून परावृत्त होतात होतात त्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होते आमदार चौघुले यांनी आँलिपिंक खेळ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व खेळाडूना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे ही भिवंडीसाठी गौरवास्पद बाब असल्याचे मत व्यक्त करून आ.चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
चौकट
भिवंडीत दि.10 ते 21 एप्रिल दरम्यान ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा माध्यमातून विविध ठिकाणी 25 स्पर्धा खेळ होणार आहेत.
शहरातील स्व.परशराम टावरे स्टेडियम सह विविध ठिकाणी असलेल्या मैदानात या स्पर्धा होणार असल्याची माहिती आ.महेश चौघुले यांनी यावेळी दिली.ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट, बॅडमिंटन,ॲथलेटिक्स,पोहणे,धावणे, बुद्धिबळ, कब्बडी,खोखो,
बॉक्सिंग,कराटे,कुस्ती,कँरम,नृत्य अशा विविध 25 मैदानी खेळ होणार असुन विजेत्यांना आकर्षक ट्राँफी,बक्षीस व प्रमाणपत्र देणार असल्याची माहिती आ.चौघुले यांनी कार्यक्रम दरम्यान दिली.