बालसुधारगृहात नवकार महामहा मंत्र जप आराधना.
भिवंडी (शरद भसाळे ) जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मो कल्याण महोत्सव भिवंडी शहर परिसरातील मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात भक्तीमय वातावरण संपन्न झाला.यानिमित्ताने आज गुरुवारी सकाळी वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे वीस हजारांहून अधिक महिला व पुरुष सहभागी झाले होते.यावेळी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भगवान महावीर उत्सवा निमित्त काल बुधवार रोजी जितो या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निमित्त शहरातील नेमिनाथ मंदिर, सुपार्श्वनाथ मंदिर, शंखेश्वर मंदिर व श्रद्धा मंदिर तसेच बालसुधागृहात नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री.अपराजीत सुरीश्वरजी महाराज यांच्या उपस्थितीत महिलासह विद्यार्थी व नागरिकांनी नवकार महामंत्र जप करून भगवान महावीर यांची आराधना केली.

जैन समाजाचे मिठालाल जैन,प्रदिप राका, जयंतीलाल भंडारी,पालिकेचे माजी जेष्ठ नगरसेवक नारायण चौधरी, निलेश चौधरी, माजी सभागृह नेते सुमित पाटील,संतोष शेट्टी, भाजपचे नेते विकास बाफना,अशोक के.जैन,अशोक पालरेचा,वंश राका अदि मान्यवर उपस्थित होते.जैन महासंघाच्यावतीने भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जैन मंदिरात सकाळी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत रथयात्रा काढण्यात आली होती.जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निघालेली रथयात्रा ठाणगे आळी,
नवीचाळ, प्रभुआळी मंडई,कणेरी, गौरीपाडा,
धामणकर नाका चौक ते अंजुरफाटा रोडवरील शंंखेश्वर मंदिर येथे दुपारी समारोप झाली यावेळी महाप्रसाद सुध्दा आयोजित करण्यात आला होता.हजारो नागरिकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला.