विज ट्रान्सफार्मर मधील तांब्याची तार चोरी करणा-या सहा जणांच्या टोळीस भिवंडी पोलिसांनी केली अटक,200 किलो तांबे जप्त..

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी  )शहापुर, कसारा,वाशिंद भागात मोठ्या प्रमाणावरती वीज ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरी प्रकरणी गुन्हे वाढत असल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिल्याने ठाणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या विशेष पथकाने सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.त्यांच्या कडून शहापूर,कसारा, वाशिंद या परिसरातील अनेक गुन्ह्यांची उकल करत एक लाख 33 हजार किमतीचा तांबे काँईल मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  शहापूर तालुक्यातील पुणधे येथील मिड लॅन्ड कंपनी येथील बंद पडलेला वीज ट्रान्सफार्मर अज्ञात आरोपी यांनी उघडून  त्यातील तांब्याच्या कॉईल काढुन चोरी केली होती तर सांज पॉवर टेक कंपनी मधील 15 मिटर कॉपरची वायर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस स्वामी यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी
स्थानिक गुन्हे शाखा वेगवेगळे तपास पथक नेमून काम सुरू केले.या पथकातील पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम,पोलिस कर्मचारी प्रकाश साईल,संतोष सुर्वे,सुनिल कदम,
हनुमंत गायकर,उमेश ठाकरे,सतीष कोळी,
हेमंत विभुते,जितेंन्द्र वारके,गोविंद कोळी,
सुहास सोनावणे,
विजय भोईर,स्वप्नील बोडके या पोलीस पथकास गोपणीय माहिती मिळाली की,शहापुर पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी हे ट्रान्सफॉर्मर चोरी मधील सराईत चोर असल्याचे समजल्याने त्यांनी सखोल तपास चौकशी करीत  अब्दुल रशिद अब्दुल अजीज मन्सुरी,
अमजद उल्ला वैदुल्ला चौधरी,मकसूद अहमद दोस्त महम्मद खान,नबीमोहम्मद अन्सार उल्लाखान,
रिझवान अस्तमअली सिध्दीकी,कमालउद्दीन रहेमतुम शेख यांचा ताबा कारागृहातुन घेवुन त्यांचेकडे कडून चौकशी करून तपास केला असता त्यांनी शहापूर,कसारा,वासिंद परिसरात अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या जवळून एक लाख 33 हजार 680 रुपये किमतीची 200 किलो ट्रान्सफार्मर मधील तांब्याची कॉईल जप्त केली आहे.पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *