भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरात नशापान करण्यासाठी गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करीत कारवाया सुरू केल्या आहेत.असे असताना सुध्दा गांजा विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. असे असतानाच शांतीनगर पोलिसांनी धडकपणे केलेल्या कारवाईत सुमारे 2 लाख रुपये किमंतीचा 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करीत दोघा जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करून अटक केली आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात दोन इसम गांजा विक्री साठी येत असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना मिळाली.त्यांनी पोलीस उपाआयुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे,कर्मचारी संतोष पवार,किरण जाधव,श्रीकांत पाटील,रोशन जाधव, रवींद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर यांनी नाशिक रोड पाईप लाईन रोड पोगाव चौकी जवळ सापळा लावला असता त्याठिकाणी संशयित दोन इसम रिक्षा नंबर एम एच 05 डीझेड 9335 मधून त्या ठिकाणी आले असता पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्या रिक्षात 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.पोलिसांनी रिक्षा चालक गुलाब हुसेन इस्राईलमियाँ सलमानी (वय 22) व सादीकअली बहादुर खान (वय 27 दोघे रा.टिटवाळा रोड, बनेली गाव ता.कल्याण)
या दोघांना ताब्यात घेऊन 2 लाख 10 हजार रुपयांचा गांजा,रिक्षा व मोबाईल असा एकूण 3 लाख 40 हजार 770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मादक नशेचे पदार्थ विकणाऱ्यां विरोधात विशेष मोहीम सुरू केली ज्यामध्ये तीन गुन्ह्यात एकूण 19 किलो 650 ग्रॅम वजनाचा 6 लाख 4 हजार 270 रुपये किमतीचा गांजा जप्त करीत आठ आरोपींना अटक केली आहे.तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 112 व्यक्तीं विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती माहिती व.पो.नि.शंकर इंदलकर यांनी दिली आहे.
