भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सहा वेळा विजयी झालेला आहे.त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडेच असावा अशी कडक भूमिका घ्यावी अशी आक्रमक मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे विविध जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली असून याबाबत लेखी निवेदन दिले आहे.

ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन,माजी खासदार सुरेश टावरे,कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सचिव मनिषा गणोरे,पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या सह मान्यवर मुरबाड,शहापूर, कल्याण, भिवंडी पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.याबाबत त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही असे असताना ते कोणत्या आधारावर भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत असा सवाल यावेळी प्रदेश सचिव मनिष गणोरे,कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.भिवंडी लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे.येथे 6 वेळा पक्षाचे खासदार होते.त्यामुळे या जागेवर हक्क आहे असा आक्रमक भूमिका ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,माजी खासदार सुरेश टावरे,शहर अध्यक्ष रशिद ताहीर मोमीन,युवा प्रदेश सचिव विरेन चोरघे यांनी घेतली आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे पक्षाचेवतीने बुथ प्रमुख व अन्य निवडणूक विभाग कार्यकर्ते काम करीत आहेत.असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघावर दावा करीत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी पक्ष कार्यालयात तातडीने पक्षाचे शहरध्यक्ष रशिद ताहीर मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन भिवंडी जागा काँग्रेस पक्ष लढविणार असल्याचे मोमीन यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा भिवंडी बालेकिल्ला आहे. येथील मतदार हे मतदान करताना ईव्हीएम यंत्र मशीन वर पंजा चे चिन्ह शोधत असतात जर पंजा चे निशाणी दिसली नाही तर परंपरागत मतदार हा नेमका कोणाला मतदान करेल हे सांगता येणार नाही अशी माहिती रशिद ताहीर मोमीन यांनी दिली.भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना लेखी निवेदन देणार असल्याची माहिती मोमीन व दयानंद चोरघे यांनी दिली.
भिवंडी लोकसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला हजारो मतांचे मताधिक्य मिळत आले असल्याने पारंपारिक काँग्रेस पक्षाचे मतदारांच्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर इतर पक्षांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.