तज्ञ गुणवंत महिलांचा करण्यात आला सत्कार.
भिवंडी (शरद भसाळे) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भिवंडी वकिल संघटना आणि महिला वकील संघटनेच्या माध्यमातून न्यायालय प्रांगणात विविध मान्यवर गुणवंत महिला व वरिष्ठ वकील महिलाचा सन्मान गौरव उपस्थित मान्यवर न्यायधीश पाहुण्यांच्या हस्ते करून मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन
साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिन निमित्ताने आयोजित गौरव कार्यक्रमास वरिष्ठस्तर न्यायाधीश व्ही.एन.
गिरवलकर,न्या.एल.सी.वाडीकर,न्या.एस.बी.घुटे,न्या.पी.एम.कदम, भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील,अँड.सुयोग म्हात्रे,अँड सुधीर भोईर,अँड.कल्पेश पाटील यांच्यासह मान्यवर न्यायाधीश व वकील कार्यक्रमास उपस्थित होते.महिला वकील बरोबरच एक उत्तम गृहिणी आई बहिण मुलगी पत्नी मैत्रीण अशा अनेक भूमिका कर्तव्याने पार पाडणाऱ्या गुणवंत वकील महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या साठी वकील संघटनेच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,गायन स्पर्धा,वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या प्रोत्साहन स्पर्धेत पुरस्कार प्राप्त महिला वकिलांचा मान्यवर उपस्थित न्यायधीश यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आले.तसेच यावेळी 21 वर्षे वकिली करणाऱ्या वरिष्ठ वकील महिलांचा सन्मान करण्यात आला.या महिला दिनाच्या कार्यक्रमात सर्व महिला वकिलांसह महिला न्यायाधीश यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.