भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील
खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने अनाधिकृतपणे प्रीतीचे उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केले जात आहे. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी वर्गाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार करताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार
उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले यांच्या महसूल विभागाचे पथकाने भिवंडीतकेलेल्या धडक कारवाईत तीन सक्शन पंप एक बार्ज केला नष्ट केले असल्याची माहिती तहसीलदार
अभिजित खोले यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
भिवंडी तालुक्यातील मौजे दिवे केवणी ते खारबाव या खाडीमध्ये शनिवारी शासकीय बोटीच्या सहाय्याने गस्त घालीत असताना अनाधिकृतरित्या रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंप व बार्ज वर कार्यवाही करण्यात आली,
दिवे – केवणी समोरील वाघबील ठाणे खाडी किनारी एक सक्शन पंप पथकास आढळून आला. सक्शन.पंपचे वॉल खोलल्याने त्यामध्ये पाणी भरले गेले त्यामुळे पथकाने
सक्शन पंप चे पाईप कट करून ते पेटवून देऊन सक्शन पंप खाडी पात्रामध्ये बुडविण्यात आला. तर पिंपळास ते
कोन गांव खाडी मध्ये अनधिकृत रेती उपसा करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज पकडण्यात आले.
ही सर्व साधनसामुग्री भिवंडीतील कोन येथील बंदरावर खेचून आणून गॅस कटर च्या साहाय्याने सक्शन पंप व बार्ज नष्ट करून अज्ञात रेती
उत्खनन करणाऱ्यां
विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.