भिवंडी ( प्रतिनिधी ) शिक्षणाची ओढ ही नेहमी आनंददायी व आयुष्यात स्मरण देत आपले जीवन उज्वल घडवणारी असते. शिक्षण घेत असताना आपल्या सोबत मैत्री करून मार्गदर्शन करणारे काही जिवलग मित्रही जोडले जातात शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर हे मित्र अनेक वेळा उद्योग व्यवसाय नोकरीच्या भूमिकेतून अन्य ठिकाणी निघून जातात काही मित्र हे आपल्या आठवणी कायम असतात त्यामुळे त्यांना भेटण्याची व मैत्रीची ओळख कायम टिकावी यासाठी नेहमीच आपण त्यांचे स्मरण करत असते आयुष्यात आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी आपली प्राथमिक शाळेची ओढ प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा ठेवा असतो,अशा ठिकाणी जाऊन आपल्या आठवणी जागविण्याचा प्रयत्न केला जातो.त्यासाठी आपण नेहमी मैत्री टिकवण्यासाठी एकमेकांचे संपर्कात असतो.महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डावरगांव केंद्रीय प्राथमिक शाळेत 1973 – 74 या वर्षी सातवीचा वर्ग सुरू झाला.

या पहिल्या तुकडीतील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सातवीच्या वर्गाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मैत्री स्नेहसंमेलन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.शाळेच्या या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास गांवातील नागरिक,महिला व लोकप्रतिनिधी,
शाळांचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या आठवणींचे अनुभव मनोगत व्यक्त करीत मैत्री चे प्रसंगाला उजाळा दिला.1974 मध्ये या शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेल्या सर्व पाच शेतकरी कन्या सहकुटुंब व महाराष्ट्र राज्य आरोग्य वैद्यकीय विभागाचे संचालक सुप्रसिद्ध डॉक्टर कारभारी खरात हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग तर शाळेसाठी कपाट व कॉंम्प्युटरचा प्रिंटर भेट देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली.तसेच ५० वर्षानंतर पुन्हा विद्यार्थी बनून वर्गात बसण्याचा आनंद आपल्या डोळ्यात साठवला. डॉ.कारभारी खरात, मुकुंद खरात,सय्यद याकूब, पदमाबाई जाधव, गोपिनाथ खरात,मुकुंद खरात,उमेश खरात,कमलाकर खरात,अॕड.विलास खरात,रावसाहेब खरात, बाबासाहेब अनासरे,रंगनाथ खरात,भीमराव तांबे,माधव तांबे,सुलाने सर,गोपीनाथ खरात, सदाशिव खरात,देवराव खरात,कृष्णा खरात,रमेश खरात,संजीव खरात, ज्ञानेश्वर माऊली,माणिकराव,फुळमाळी, बहुरे,पंढरीनाथ खरात या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कोळीव लाड,पवार,सौ.पठाडे,मॅडम,तांबे,धाईडे,
सुलाने,थोरात या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.