भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

भिवंडी

महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – 


भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी  होणाऱ्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सज्ज असुन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामकाजाला लागावे आपल्या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून मतदार याद्यांची व दुबार नावांची तपासणी करावी यंदा भिवंडी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सुसज्ज रहावे असे आवाहन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रूपेश म्हात्रे व ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केले.
     भिवंडीत आगामी होणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस,
समाजवादी पक्ष व शिवसेनेने निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे.


इच्छुक उमेदवारांना काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून  अर्ज वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्यावतीने पद्मानगर येथील वेंदात सभागृहात शिवसेना पक्षाचे उपनेते रुपेश म्हात्रे व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवडणूक संदर्भात विशेष आढावा  बैठक काल बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.यावेळी शिवसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर, नगरसेवक बाळाराम चौधरी,
संजय म्हात्रे,दिलीप गुळवी,
शहरप्रमुख संजय काबुकर,श्याम पाटील,जावेद आझमी,समीर पवार व  महिला आघाडीच्या अनुराधा कल्याणम,
मनिषा पाध्ये,आरती गुप्ता, मंगल देशमुख, शितल पाटील अदि महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक ही महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत.मात्र पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या 90 वार्डात उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात नागरी समस्या कामकाजाचा आढावा घेऊन कामाला सुरुवात करावी,मतदारांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या चे निराकरण करावे तसेच मतदार याद्यांची तपासणी करून दुबार नावा संदर्भात हरकती घ्याव्यात असे आवाहन यावेळी शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे यांनी केले. निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क करून कामाला लागावे.निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे घेणार असले तरी आपण सर्व जागा लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी दिली. भिवंडी महा पालिकेवर यंदा
महायुतीचा भगवा झेंडा फडकवा असे आवाहन शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख थळे यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून प्रत्येक वार्ड व प्रभागां विषयी माहिती घेण्यात आली. निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली असुन होणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जाव्यात अशी अपेक्षा  जिल्हाप्रमुख थळे यांनी व्यक्त केली आहे.पक्षाच्या कार्यकर्तेनी आपापल्या प्रभागातील नवतरूण मतदार व  महिला मतदारांसोबत संवाद साधून  कामाला सुरुवात करावी
असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *