भिवंडी ( प्रतिनिधी ) मतदारांनी जातपात न पाहता भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले लोकप्रिय भाजप महायुतीचे उमेदवार महेश चौघुले यांना मतदान करून विकास काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे गोरखपुर येथील खासदार व चित्रपट अभिनेता रवी किशन यांनी भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केले
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार महेश चौघुले हे तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे,

त्यामुळे ते जागोजागी प्रचार सभा व पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधत आहे, भिवंडी महापालिकेचे माजी नगरसेवक यशवंत चौधरी यांच्या पुढाकाराने आज रविवार भिवंडीतील नारपोली भंडारी चौक येथे भाजपा उमेदवार महेश चौघुले यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोरखपुर चे भाजपा खासदार रवी किशन हे व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांच्यासोबत भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील,माजी नगरसेवक निलेश चौधरी,भाजपा महिला अध्यक्षा सुनिता टावरे,हनुमान चौधरी,प्रकाश टावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल फडतरे,अँड प्रवीण मिश्रा, विशाल पाठारे,मंगेश यादव यांच्या सह पक्षाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रचारासाठी आलेले खासदार रवी किशन यांनी आपल्या भाषणात उत्तर भारतीयां समाजासह भोजपुरी भाषेत सर्व भोजपुरी भाषिकां कडून महेश चौघुले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे वचन घेतले.जातीच्या आधारे आणि केवळ हिंदूच्या नावावर मतदान विभाजन न करता महेश चौघुले यांना प्रचंड मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले, यावेळी हर हर महादेव ची घोषणा करीत हजारो स्त्री-पुरुषांनी हात उंचावून चौघुले यांना पाठिंबा दिला रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.