भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे एक लाख सदस्यनोंदणीचे लक्ष्य – कपिल पाटील

भिवंडी


माजी केंद्रीय राज्यमंत्रीचे उपस्थितीत बैठक संपन्न

भिवंडी  (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण मतदारसंघात उत्साहात सुरुवात झाली असून, या मतदारसंघात भाजपाची एक लाख सदस्यनोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. तसेच याबाबत पाटील यांनी विशेष बैठक घेऊन सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


    भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाकडून पक्ष सदस्यांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.त्यानुसार राज्यभरात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातही नोंदणीला सुरुवात झाली आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत आज विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे,जिल्हा परिषद सदस्य देंवेश पाटील,माजी सरपंच छत्रपती पाटील यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान चार हजार सदस्यांची नोंदणी करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यात महिला सदस्यांची नोंदणी मोठ्या संख्येने करण्याचे ठरविण्यात आले आहे. तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे एक लाख सदस्य नोंदविण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *