नामदेव शिंपी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर मेळावा कल्याण येथे संपन्न..

भिवंडी



भिवंडीतील मंदिराचे मदतीसाठी कार्यक्रम..

भिवंडी (बी.एस) ठाणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या भिवंडी शहरातील बाजारपेठ ठाणगे आळी येथे असलेल्या
विश्व संत शिरोमणी नामदेव महाराज या मंदिरा चा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.त्या निमित्ताने कल्याण येथील सभागृहात राज्यस्तरीय वधू व वर पालक संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या संमेलनात भिवंडी कल्याण, मुंबई नाशिक पुणे, ठाणे डोंबिवली व अहमदाबाद सह अन्य मोठ्या शहरातून महिला व पालकांनी वधू व वरानी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रम यशस्वी केला. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जनसेना पार्टीचे अध्यक्ष अशोकभाऊ खैरनार हे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर नामदेव समाज भिवंडी अध्यक्ष महेंद्र माडकर, जिल्हा समन्वय भानुदास भसाळे, कल्याण नामदेव शिंपी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष चंद्रकांत सारंगधर,बदलापूर शिंपी समाज हितवर्धक संस्था अध्यक्ष संजय बोगाळे,शहापूर नामदेव शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र मुळे,जेष्ठ पत्रकार शरद भसाळे, मुरबाड शिंपी समाज अध्यक्ष गणेश टिबे,जिल्हा समन्वयक गुरूनाथ माळवदे,रोहीत यवतकर,डॉ.राजन पोरे, अदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सर्व शिंपी समाज बांधवांनी आपसामध्ये जाती व पोट जातीचा विचार न करता उपवर मुला व मुलींच्या उज्वल भविष्याचा विचार करून विवाह लग्न कार्य सोहळा पसंती प्रमाणे जुळविणे व नातेसंबंध जपण्याची भूमिका बजावणे ही आता काळाची गरज आहे त्यामुळे सर्व शिंपी समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुणे व समाज अध्यक्ष बांधवांकडून करण्यात आली, तसेच संत नामदेव महाराज यांच्या भिवंडीतील मंदिरासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन ठाणे जिल्हा नामदेव समाज उन्नती मंडळाच्यावतीने करण्यात आले,यावेळी नामदेव शिंपी,अहिर,
भावसार, वैष्णव, व समस्त शिंपी समाज बांधव, उपवर वधू व वर पालकवर्ग या मेळावा संमेलन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हा संमेलन सोहळा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व शिंपी समाज बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेतली.नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात सहभाग तसेच सामाजिक जागृती करून संघटन शक्तीचे महत्व अशा बहुउद्देशीय संकल्पना घेऊन हा आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *