भिवंडीत नालेसफाई काम करीत असताना कामगारांचा मृत्यू…

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भि्वंडी शहर महानगर पालिकेच्यावतीने एक ते पाच प्रभाग कार्यक्षेत्रात नालेसफाई चे काम
महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार व आरोग्य व स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त फैजल तातली या मार्गदर्शनाखाली
सुरू झाले आहे,नालेसफाई काम सुरू असताना महापालिका अधिकारी तसेच कंत्राटदार हजर असणे आवश्यक आहे,तसेच सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कामगारांना हातमोजे, गमबूट व गणवेश सारखे इतर महत्त्वाची साधनसामग्री देणे हे कायद्याने बंधनकारक आहे मात्र ते दिले जात नसल्याने कामगार वर्ग व भीमशक्ती व सामाजिक संघटना व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत. ठेकेदारामार्फत नाले सफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षितच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची साधनसामग्री दिली जात नसल्याचे उघड झाले आहे असे असतानाच आज दुपारी भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिरानी पाडा भागात नाले सफाई काम करत असताना एका कामगाराचा नाल्यांमध्ये मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत सध्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आले असून चौकशी सुरू झाली आहे.
सुभाष (रा.मीठपाडा, भिवंडी )असे मयत कामगाराचे नाव असून प्रभाग समिती दोन अंतर्गत येणाऱ्या शहरातील शांतीनगर पिराणी पाडा येथे दुपारी कामगार नालेसफाई चे काम करत असताना जेवणाची वेळ झाली म्हणून ते एका ठिकाणी जमले होते, मात्र त्यांना आपला एक साथीदार कामगार दिसून न आल्यामुळे त्यांनी शोध सुरू केला मात्र तो न सापडल्याने साफसफाई सुरू असलेल्या सायंकाळी नाल्यांमध्ये उतरून त्याचा शोध घेतला असता तो तेथे बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला त्यामुळे कामगारांनी तातडीने त्यास स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून
त्यास मयत घोषित केले, त्यामुळे परिसरात शोक काळा पसरली आहे, या परिसरात चंडिका कन्स्ट्रक्शन कंत्राटदार नालेसफाई चे काम करत असून कामगारांना नाले सफाई करताना कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री सुरक्षितेचे दृष्टिकोनातून देण्यात आली नसल्याचे यावेळी उपस्थित नागरिक व कामगारांनी दिली त्यामुळे महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर व भिवंडी पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती संघटना व पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.