भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र महिना रमजान महिना दिना निमित्ताने
शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षाच्यावतीने रोजा इफ्तार कार्यक्रम अंतिम टप्प्यात आयोजित केले जात आहेत.त्या अनुषंगाने सामाजिक राष्ट्रीय
एकात्मता व जातीय सलोखा अंतर्गत भिवंडी शहरात पोलीस उपआयुक्त परिमंडळ- 2यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवा साठी ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम आयोजन काल सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी ठाणे पोलिस आयुक्त व शहरातील मान्यवर नागरीकांसह मुस्लिम बांधव व शांतता समीती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असुन अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळेराष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी भाईचारा या भूमिकेतून भिवंडी पोलीस उपआयुक्त कार्यालयाचेवतीने “रोजा इफ्तार”कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास ठाणे अपर पोलीस आयुक्त श्री.देशमुख,भिवंडी पोलीस उपआयुक्त श्रीकांत परोपकारी,एसीपी दिपक देशमुख, श्री.सांगळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, वपोनि महादेव कुंभार,
वपोनि भरत कामत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला,नागरिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक सण व उत्सव हे सामाजीक व एकतेचा व समृध्दीचा संदेश देत असतात.

त्यामुळे नागरिकां मध्ये कुटूंब वत्सल नाते जुळत असते. आयुष्यात प्रत्येकाने शिस्तीचे पालन केल्यास कोणतेही संकट येणार नाही. आापले जीवन सुखी आणि समृध्दीचे होईल असे मत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करून सर्वाना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवावी असे आवाहन पोलीस आयुक्त डुंबरे यांनी व्यक्त केले.