भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण भिवंडी शहर परिसरात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ईद निमित्त शहरातील विविध मशिदीमध्ये सकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सुमारे 25 हजारांहून अधिक मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा केली.

यावेळी ठिकठिकाणी सुसज्ज पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रमजान ईद हा सण अत्यंत महत्त्वाचा असल्याने घरा घरात गोड दुधाची शिरखुरमा पदार्थाचा आस्वाद घेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शहरातील शांतीनगर, भोईवाडा, गैबी नगर, पटेल नगर, वंजारपाटीनाका,इदगाह मैदान,दर्गारोड,कोटरगेट मस्जिद अशा विविध मशिदी मधून नमाज अदा करण्यात आली.प्रसंगी ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख,भिवंडी पोलीस उपआयुक्त श्रीकांत परोपकारी,एसीपी दिपक देशमुख, सचिन सांगळे,वपोनि संतोष आव्हाड,महादेव कुंभार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना नमाज अदा केल्या नंतर गुलाब फुल देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले,माजी आमदार रशिद ताहीर मोमीन, माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रूपेश म्हात्रे,माजी नगरसेवक तारीक फारूकी,माजी महापौर जावेद दळवी,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुजाउद्दीन अंसारी,अनस अन्सारी सोहेल खान यांच्या सह मान्यवर नगरसेवकानी यावेळी मुस्लिम समाज बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.