लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पुढाऱ्याची उपस्थिती
भिवंडी (प्रतिनिधी) नववर्ष गुढीपाडव्या निमीत्ताने भिवंडी शहरातील विविध भागात सालाबाद प्रमाणे मोठय़ा जल्लोषात स्वागतयात्रा वाजतगाजत काढण्यात आल्या होत्या.महिला वर्गासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीचे प्रचार वारे जोमाने वाहू लागले आहेत.त्यामुळे स्वागत यात्रेमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री तथा उमेदवार कपिल पाटील,महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळामामा) म्हात्रे हे आपल्या समर्थकांसह सहभागी झाल्याने प्रचाराची चर्चा पडसाद उमटत होती.निवडणूक पार्श्वभूमीवर मतदान करा या बाबत भिवंडी मनपा व जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली सामाजिक संस्थांकडून जनजागृती चे फलक लावून करण्यात आली.तसेच पर्यावरणाचे रक्षण करा “झाडे लावा झाडे
जगवा ” व पाण्याची बचत करा असा संदेश यावेळी देण्यात आला.

शहरातील ब्राम्हण आळी गणपती मंदिर येथुन सकाळी 7:30वा टिळक चौक मित्र मंडळ याच्यावतीने स्वागत यात्रेस प्रारंभ करण्यात आला.उदंड ढोलताशा पथक,शिवाजी नगर पथक व शिवस्वरूप ढोलताशा पथकाच्या वाजतगाजत निघालेल्या गजरात या स्वागत यात्रेत आमदार महेश चौघुले,माजी सभागृह नेते सुमित पाटील,माजी नगरसेवक संतोष शेट्टी,प्रशांत लाड,भाजप अध्यक्ष अँड.हर्षल पाटील,
शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गाजेंगी,मनोज गगे,सुहास बोंडे,सुरेश कारेकर,पराग मेहता अदि मान्यवर नागरिक व महिला वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

शहरात निघालेल्या स्वागत यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक गुढी उभारून रांगोळ्या काढण्यात आल्या.त्याच प्रमाणे धामणकर नाका येथे
प.अण्णासाहेब जाधव विद्यालयाच्यावतीने सुद्धा भव्य राष्ट्रीय एकात्मता आधारीत शोभायात्रा काढण्यात आली होती.संस्थेचे प्रमुख विजय जाधव,मुख्याध्यापक सुधीर घागस, उपमुख्याध्यापक आर.एस.शिंदे पर्यवेक्षक शिक्षक ज्ञानेश्वर गोसावी,आर.जाधव,श्री.मोरे यांच्या सह मान्यवर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच गोपाळनगर येथे दादासाहेब दांडेकर विद्यालयाचेवतीने विद्यार्थ्यांनी देखील गोपाळनगर,अशोकनगर आदि भागातून ही स्वागत यात्रा काढली.