भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना
भिवंडी ( बी.एस. ) पोलिस प्रशासनाने 2009 मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केले होते.2019 मध्ये त्याचे नाव भरोसा कक्ष असे केले आहे.त्यामा ध्यमातून गरजू कुटुंबीयांना भरोसा व विश्वास देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे.असल्याचे मत ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज सोमवारी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भरोसा कक्षाचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले,पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील,भिवंडी पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्यासह पोलिस निरीक्षक,महिलासामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिवंडी शहरातील महिलांना ठाणे येथे येण्याचा त्रास टाळावा यासाठी भिवंडीत हा कक्ष सुरू करण्यात येत आहे.घटस्फोटाची कारणे काळानुरूप बदलत गेली.शुल्लक कारणावरून घटस्फोट घेतले जातात.त्यामध्ये महिला देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.पण यामध्ये प्रश्न त्या दोघांचा नसतो तर अनेकांवर त्याचा परिणाम होत असतो.त्यांचे समुपदेशन,मार्गदर्शन करून कुटुंब जोडण्याचे काम होणार आहे असे सांगत ठाणे पोलिस आयुक्तालयात मागील दीड वर्षात 910 तक्रार भरोसा कक्षात दाखल झाल्या त्यापैकी 400 तक्रारींमध्ये तडजोड करून कुटुंब जोडण्यात यश मिळाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी कायदा राबविताना सामाजिक भान राखून कौटुंबिक वाद सोडवताना मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.संयुक्त कुटुंब संपुष्टात येत असताना छोट्या कुटुंबात शुल्लक कारणातून कौटुंबिक वाद वाढत असतात त्यामध्ये समाजाचे समाधान करण्याचे काम नक्कीच होईल असे मत ठाणे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली.भरोसा कक्ष हा सुरवाती पासून ठाणे
पोलिस आयुक्तालयात गुन्हे विभागाच्या
अंतर्गत सुरू होता.कौटुंबिक वाद गुन्हे दाखल करण्या पूर्वी भरोसा कक्षात समुपदेशन मार्गदर्शन करून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. भिवंडी परिसरातील महिलांना ठाणे येथे येणे वेळकाढू व खर्चिक असल्याने पोलिस
आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भिवंडी येथे भरोसा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रास्तावीक गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले.भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी करताना एक जुलै पासून जुने कायदे संहिता रद्द करून नव्याने अमलात आलेल्या भारतीय न्याय संहिता,
भारतीय सुरक्षा संहिता,भारतीय साक्ष संहिता याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
चौकट
समाजकंटकांपासुन नागरीकांचे संरक्षण करण्याकरीता,महीलांचे व बालकांचे संरक्षण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व नागरीकांना मदत मिळावी यासाठी शासन आदेशानुसार कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.