कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी

भिवंडी

 

भिवंडी ( प्रतिनिधी ) विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या व्दिवार्षिक निवडणुकीचे मतमोजणीत भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला.

डावखरे विजयी झाल्याची घोषणा होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेनी जल्लोष व्यक्त करीत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातची मतमोजणी आज सोमवारी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली.

मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण एक लाख 43 हजार 297  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी एक लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार  226 मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  66 हजार 036  इतक्या मतांचा  कोटा ठेवण्यात आला.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

 

1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719

2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस  :- 28 हजार 585

3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  :- 536

4) अमोल अनंत पवार, अपक्ष  :- 200

5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310

6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302

7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  :- 424

8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64

9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215

10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33

11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष  :- 208

12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष  :- 334

13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष  :- 141

पहिल्या पसंतीची  एक लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार  निरंजन वसंत डावखरे  हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या विजयानंतर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा व्यक्त करीत अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *