भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे 12 एप्रिल रोजी उद्घाटन

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव भिवंडी शहरामध्ये मोठ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे.त्यामुळे आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष बाळाराम जाधव,उपाध्यक्ष बबन घोडके,सरचिटणीस संजय मोरे,लक्ष्मण गायकवाड,
मंगेश जाधव,सल्लागार सुरेश मस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन येत्या रविवार 12 एप्रिल 26 रोजी सायंकाळी ६:०० वाजता जुनी भिवंडी मनपा कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून होणार असुन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे महापौर नारायण चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.तसेच खासदार सुरेश म्हात्रे,माजी खासदार कपिल पाटील,आमदार महेश चौगुले,आ.रईस शेख यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले आहे.जयंती उत्सवा निमित्त शहरातील कोंबडपाडा,
वराळदेवी नगर,राहुल नगर, कामतघर,श्रमिक नगर,फुलेनगर,संगम पाडा,खोणी गाव,
गायत्रीनगर,अंजुरफाटा अशा विविध भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने देखावे उभारण्यात येणार असुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली आहे.मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा धामणकर नाका येथून वाजत गाजत निघणार असुन विविध भागात फिरून भिवंडी महापालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करून समाप्त होणार आहे.तरी नागरिकांनी या शोभायात्रे मध्ये सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होऊन उत्साहाचा आनंद घ्यावा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.