भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त भिवंडीत भव्य मिरवणूक सोहळा संपन्न.हजारो भिमसैनिक सहभागी..

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त भिवंडीत मंगळवारी सायंकाळी बाबासाहेब यांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी 15 हजारांहून अधिक भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.नागरिकांच्यावतीने ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर ह फुलांची उधळण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी 7:15 वा.धामनकर नाका चौकात ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख,पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे,महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौगुले,जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड,सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे, एसीपी अशोक होणमाने,नगरसेवक संतोष शेट्टी अदि मान्यवरांच्या हस्ते रथा ठेवण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात झाली.यावेळी उत्सव समितीचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव,लक्ष्मण गायकवाड,सुमित्र कांबळे,श्रीपत तांबे,संजय मोरे, बबन घोडके,अंकुश बचुटे,सुरेश मस्के,विकास निकम,अशोक पाटोळे, बालाजी कांबळे,पिंटया पाईकराव,अँड.अजय पालके यांच्या सह सर्व पदाधिकारी व सल्लागार,शांतता समीती,निरीक्षण समीती सदस्य उपस्थित होते. विद्युतमाळा व फुलांनी सजविलेल्या ट्रक. टेम्पो,रथा मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेऊन ढोल ताशा वाजंत्री,फटाक्यांची आतिषबाजी व डिजे चे तालावर नुत्ये करत भिम सैनिक व महिला जल्लोष करत मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी विविध सार्वजनिक मंडळ व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भिमसैनिकांचे स्वागत करण्यात आले.सविधान,शिक्षण,
पाणी बचत,स्वच्छता अशा विविध विषयावर जनजागृती फलक या मिरवणुकीतील गाडीवर लावण्यात आले होते.सदर मिरवणूक कणेरी,गौरीपाडा,
रोशनबाग,प्रभुआळी,मंडई,तीनबत्ती,कोटरगेट मशिद मार्गे ही मिरवणूक भिवंडी पालिके समोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळया समोर चौकात मध्यरात्रीच्या सुमारास संपन्न झाली.या वेळी महामानवास सामुहिकरित्या आदरांजली वाहण्यात आली.उत्सव निमित्त विविध मंडळांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित देखावे शहरातील विविध ठिकाणी उभारले होते.यावेळी सर्वत्र विशेष पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.