सभापती पदासाठी भाजप शिवसेनेची मोर्चा बांधणी..
भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी नि.शहर महानगरपालिकेत चर्चेचा विषय ठरलेल्या १६ स्थायी समिती सदस्यांची अखेर निवड झाली असून महापौर नारायण चौधरी व मान्यवर नगरसेवक, नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
भिवंडी महानगर पालिकेत स्थायी समितीचे सदस्यांची निवड होत नसल्याने नगरसेवकांच्या गटात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती, तीन महिने झाले तरीही स्थायी समिती सदस्य निवड होत नसल्याने राजकीय पक्षांचे गटनेत्यानी महापौर नारायण चौधरी यांची भेट घेऊन सदस्य निवडी बाबतीत तगादा लावला होता अखेर बुधवारी (दि.१५) झालेल्या विशेष महासभेत विविध राजकीय पक्ष व आघाडीच्या नगरसेवकांकडून स्थायी समीती सदस्य पदासाठी गटनेत्याकडून नगरसेवकांची
नांवे मागविण्यात आली त्यानुसार
१) अन्सारी रेश्मा बानो वसीम अहमद, २)अंसारी जोहा असरार
३) अन्सारी शबाना
४) विजय भगवान भगत,
५) अन्सारी साजिद हुसैन,
( सर्व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस )
६) शेट्टी संतोष मंजय्या,
७) पाटील सुमित पुरुषोत्तम,
८) नकाते सुहास जालिंदर,
९) गीता विठोबा नाईक,
(सर्व भारतीय जनता पार्टी गट)
१०) बहाऊद्दीन फराज फजल,
११) खान ईशा इमरान, नॅशनलिस्ट
( राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (श.प) गट)
१२) नाईक अस्मिता प्रभुदास,
१३) खान सबीया दीन मो.
(शिवसेना गट)
१४) खान अमन ओबैद,
(समाजवादी पार्टी गट)
१५) मयुरेश विलास पाटील,
(कोणार्क विकास आघाडी)
१६) जावेद गुलाम मोहम्मद दळवी, (भिवंडी विकास आघाडी एकता मंच) अशा १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे.भिवंडी महानगर पालिकेत ९० नगरसेवक कार्यरत असुन त्यामध्ये विविध पक्षांचे बलाबल पाहता काँग्रेस पक्षाला ५,भाजप ४,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस २,शिवसेना २, समाजवादी पक्ष १, भिवंडी विकास आघाडी १, व कोणार्क विकास आघाडी १ असे १६ सदस्य निवडण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
चौकट
भिवंडी शहर महानगर पालिकेत भाजपचे नगरसेवक महापौर असलेले नारायण चौधरी यांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकां सोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे.त्यामुळे आता स्थायी समिती सभापती पदासाठी सुध्दा भाजप,शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या सदस्यां मध्ये जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली आहे.सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

