भिवंडी (प्रतिनिधी ) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणाऱ्या श्री भैरव सेवा समितीचे संस्थापक पुष्पतराज जैन यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने रविवार शहरातील नजराणा कम्पाउंडमधील श्री भैरव चॅरिटेबल आय हॉस्पिटल मध्ये श्री भैरव सेवा समिती,जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी,
बीएमपीए,आयएमए भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत 150 हुन अधिक लोकांनी रक्तदान केले,विशेष म्हणजे भिवंडीतील ६० वर्षाच्या भरत कृष्णाजी शेटे (अप्पी) यांनी ६३ वे रक्तदान करून रक्तदान करा असा संदेश पुन्हा दिला.
“थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी” आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये शहरातील डॉक्टर आणि सामाजिक संस्था सहभागी झाल्याने रक्तदात्यांनी दिवसभर उत्तम सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे भिवंडीतील रक्तदाता भरत शेटे उर्फ अप्पी शेटे हे नेहमी वर्षातून एका-दोनदा रक्तदान करीत असतात. त्यांनी यापूर्वी ६२ वेळा रक्तदान केले आहे. आज त्यांनी ६३ वे रक्तदान केले. त्यांची ठाणे मुंबई येथील सर्व मोठ्या हाॅस्पिटल्समध्ये चांगली ओळख असल्याने ते रुग्णांना फार मोठी मदत करतात असतात.
“रक्तदान हे “महादान” मानले जाते, एका वेळी केलेले रक्तदान ३ जीव वाचवू शकते आणि गंभीर अपघात, शस्त्रक्रिया किंवा कॅन्सर रुग्णांना जीवदान देते. रक्तदान केवळ रुग्णांसाठीच नाही, तर रक्तदात्याच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, फायदेशीर असते.त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन
अप्पी शेटे यांनी यावेळी केले.या रक्तदान शिबिरास श्री भैरव सेवा समितीचे प्रमुख अँड.गगन जैन,अनिल जैन,मनीषा भांगरे,जीवराज नगारीय,नगरसेविका रोमा आळशी, जयवंत सोनटक्के,विनोद शेटे, रामदास पाटील आणि सहभागी संस्थांचे पदाधिकारी,सदस्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

