टोरंट पावर कंपनीचेवतीने भिवंडीत
“दावत ए इफ्तार “

भिवंडी


भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात वीज पुरवठा  करणाऱ्या टोरंट पावर कंपनीचेवतीने सामाजिक एकता भाईचारा कायम असावा या भुमिकेतून रमजान महिना निमित्त मुस्लिम बांधवांसाठी  दावत ए ” इफ्तार ” हा कार्यक्रम भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील बालाजी सभागृहात आयोजित केला होता.या वेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पवित्र रमजान महिण्याचे उपस्थित बांधवाना शुभेच्छा व्यक्त केल्या भिवंडी ठाणे महामार्गावरील अंजुरफाटा येथील बालाजी बँकेट सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी 6:54 वा.टोरंट पावर कंपनीचेवतीने आयोजित करण्यात आला होता.

धार्मिक सण हे नेहमी सर्व जातीधर्माच्या लोकांनी सामाजिक एकोपा राखून संपन्न करणे आवश्यक आहे.असे मत यावेळी उपस्थित मुफ्ती मो.हुजैफा कासमी यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी शिवसेना, काँग्रेस, भाजप सह विविध पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक,पोलीस अधिकारी तसेच टोरेंट पावर कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट स्नेहल देसाई,जीवन क्लर्क,जनरल मँनेजर सुधीर देशमुख,जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांच्या सह कंपनीचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *