भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्याशांतीनगर भागातील केजीएन चौकाच्या बाजूला चाळीत पूर्व वैमान्यासातून रक्तरंजित झालेल्या दोन गटातील हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एक जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.जुबेर शोएब शेख (४८) असे मयताचे नाव असून त्याच्यावर एका गटाने केलेल्या चाकूहल्लाने त्याचा मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. तर या घटनेत दोन्ही गटाचे मिळून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने शांतीनगर मधील केजीएन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आज दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. त्यामुळे पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.या भागातील मुलाचे एकतर्फी प्रेमप्रकरण आणि क्रिकेटच्या खेळावरून गेली वर्षभर हे वैमनस्य सुरु होते. हा वाद काल मंगळवारी खेळाच्या मैदानावर सुरु होऊन ते चाळीपर्यंत आले. दोन चाळीच्या बोळामध्ये दोन गटात हि हाणामारी झाली. त्यावेळी झालेल्या चाकु हल्ल्यात जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यु झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करीत आहेत.ल
