भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनी च्या विरोधात कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिल्ली ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वीज मोफत दिली आहे त्याप्रमाणे भिवंडीतील वीज ग्राहकांना 200 युनिट वीज विनामूल्य देण्यात यावी,वीज ग्राहकांना मीटर टेस्टिंगचे रिपोर्ट देण्यात यावे,वीज ग्राहकांच्या मिटर तपासणी अती खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये,वीज कंपनी विरोधात आंदोलन करणारे मनसेचे अध्यक्ष मनोज गुळवी यांची तडीपार कारवाई तातडीने रद्द करण्यात यावी,वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावा, जादा वीज बिलाची चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन विजय कांबळे यांनी राज्य शासनाला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले.तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेते पुढारी जोपर्यंत टोरंट विरोधात मोहीम उभारत नाहीत तोपर्यंत उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन देखील विविध उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले. त्याच बरोबर मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्यावर केलेल्या तडीपार कारवाईचा यावेळी निषेध करण्यात आला.