भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेडीज ऑर्केस्ट्रा बियर बार त्याचबरोबर अनाधिकृत हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहेत.अशा ठिकाणी नवयुवक तरुण मंडळी धुरांमध्ये गुरफटातून आपले आयुष्य जीवन बरबाद करीत आहेत. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर मध्ये पोलिसांनी छापा कारवाई करीत तेथे हुक्का पिणाऱ्या 32 जणांसह हुक्का चालकांसोबत काम करणारे अशा 36 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र यावेळी कारवाई सुरू असताना तिघे जण पोलिसांना चकवा देत पळून गेले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवजी नगर येथील श्रीकार डाईंगच्या मागे भंडारी कंपाऊंड या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे जातात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या या हुक्का पार्लर वर पोलिसांनी कारवाई केली असता तेथे तब्बल 32 जण हुक्का पिण्यासाठी बसले होते.पोलिसांनी या हुक्का पिणाऱ्यां सोबतच हुक्का पार्लर चालक नरेश पुत्तू व अजित झा व दोन वेटर अशा एकूण 36 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे हुक्का पिणाऱ्या ग्राहकांची नावे पोलिस नोंद करीत असताना हुक्का पार्लर चालक नरेश पुत्तू व अजित झा व मॅनेजर विश्वनाथ झा हे त्या ठिकाणाहून पोलिसांना चकवा देथ पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.त्यामुळे पोलीस गुन्हा दाखल केला आहे. याबाबत
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.
