भिवंडी (प्रतिनिधी) नववर्षाचे औचित्य साधत व सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्व.डॉ.श्री.नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचेवतीने भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्री.क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड येथे आज सकाळी विशेष महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली स्थानिक ग्रामस्थासह शेकडो श्री सदस्यांनी सहभाग घेतला.

पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छतादुत डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
हा उपक्रम राबविण्यात आला.भिवंडी तालुक्यातील सोनाळे गांव परिसरात असलेल्या दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड येथे आज सकाळी नववर्षाचे औचित्य साधून सुमारे 500 हुन अधिक श्री सेवेकरी सदस्यांनी दिंडीगडावर येऊन परिसरातील तिनं किलोमीटर अंतरावर स्वच्छता करण्यात आली त्यात काचेच्या बाटल्या,प्लास्टिक बाटल्या, पिशव्या केरकचरा साफसफाई करून गाडी भरून सेंद्रिय खतासाठी कचरा वाहतूक करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानावतीने लावण्यात आलेली झाडे तसेच बनवलेला तळ,व रस्ता डोंगर सुशोभीकरण करण्यात आले
चौकट
या ठिकाणी सन 2019 साली लावण्यात आलेल्या एक हजार विविध प्रकारची फळ झाडांची लागवड करण्यात आली असुन दर रविवारी संगोपन करण्यासाठी श्री सेवेकरी येत असल्याची माहिती देण्यात आली.