भिवंडी ( शरद भसाळे ) गेल्या काही दिवसांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बरी नसल्याने ते भिवंडीतील रुग्णालयात उपचारा साठी दाखल झाले होते त्यांच्यावर यशस्वीरित्या चांगले उपचार झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यामुळे आज दहा दिवसानंतर नव
वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी रोजी दुपारी त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बरी नसल्याचे मुंबईतील एका कार्यक्रमात दिसून आले त्यामुळे कांबळे यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करीत त्यांनी चांगले उपचार घ्यावे आणि चांगले टणटणीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करीत होते. असे असतानाच भिवंडीतील आकृती हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर यांनी विनोद कांबळी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या बांद्रा येथील घरातून थेट भिवंडी येथील आपल्या आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्णालया कडून कांबळी यांच्यावर मोफत उपचार करण्याचे जाहीर करत उपचार सुरू केले,दरम्यान महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मान्यवरांनी कांबळी यांची रूग्णालयात भेट घेऊन अर्थिक मदत देत त्यांना दिलासा दिला.

कांबळी यांस पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहता याव यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी विशेष मेहनत घेतल्याने त्या मुळेच विनोद कांबळी ठणठणीत बरे होत आज घरी जाण्यासाठी निघाले असता विनोद कांबळी यांना रुग्णालयात भारतीय क्रिकेट जर्सी कपडे घालून बॅट हाती घेऊन काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
उपस्थित डॉक्टर व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.
चौकट
सर्वांनी दाखवलेले प्रेम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतलेली काळजी यामुळेच आपण बरे झालो असून माझे क्रिकेट संपलेले नाही आणि मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत मी पुन्हा शिवाजी पार्क येथे जाऊन क्रिकेट खेळणार असा विश्वास विनोद कांबळी यांनी यावेळी व्यक्त करीत दारु पासून दुर रहा असा संदेश दिला.