नागरिकांनी केली फुलांची उधळण.
भिवंडी (शरद भसाळे) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सवा निमित्त भिवंडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने सोमवारी सायंकाळी काढण्यात आली होती.
हजारो भिम सैनिकांसह महिला – नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हिंदु व मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी पुष्पहार व फुल अर्पण करीत अभिवादन केले यावेळी अनुचित प्रकार घडु नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर यांच्या उपस्थितीत विशेष पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.

सार्वजनिक उत्सव समितीचेवतीने धामणकर नाका येथून सायंकाळी 6:30 वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला.आमदार महेश चौघुले,पोलीस उपायुक्त मोहन दहीकर,एसीपी दिपक देशमुख,माजी नगरसेवक संतोष शेट्टी,भाजप अध्यक्ष हर्षल पाटील,उत्सव समीतीचे लक्ष्मण गायकवाड,श्रीपत तांबे,सुमित्र कांबळे,विकास निकम यांच्यासह मान्यवरांनी महामानवाचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विद्युत माळा व फुलांनी सजविलेल्या ट्रक,टेम्पो,रथा मध्ये बाबासाहेब याची प्रतिमा ठेऊन ढोल ताशा वाजंत्री,डिजे चे तालावर नुत्ये करत भिम सैनिक व महिला जल्लोष करत मिरवणुकीत सहभागी झाले होते.पर्यावरण संरक्षण,पाणी बचत,शैक्षणिक जन जागरण,स्वच्छता, महिला सुरक्षा अशा विविध विषयावर फलक या मिरवणुकीत लावण्यात आले होते.

विविध सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांचेवतीने मिरवणूक व भिम सैनिकांचे स्वागत करण्यात आले. कणेरी,गौरीपाडा, रोशनबाग, प्रभुआळी मंडई,नवीचाळ, तीनबत्ती, कोटरगेट मशिद मार्गे ही मिरवणूक भिवंडी महापालिके समोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर चौकात मध्यरात्री संपन्न झाली.या वेळी महामानवास सामुहिकरित्या आदरांजली वाहण्यात आली.जयंती उत्सव निमित्त विविध मंडळांनी बाबासाहेब यांच्या जिवनावर आधारित आकर्षक देखावे शहरात उभारले होते.