13 लाखाचा माल केला जप्त.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात बेकायदेशीरपणे चरस,गांजा सारखे विविध मादक पदार्थ छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे, या अवैद्य धंद्याला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून भिवंडी शहरातील जुना मुंबई – आग्रा रोडवरील निजामपुरा परिसरातील 32 कॉटर्स,रेशन ऑफिस कार्यालया जवळ चरस मादक पदार्थ विक्री साठी एक इसम येणार असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना मिळताच त्यांनी आपल्या विशेष पोलीस पथकासह सदर भागात सापळा रचून चरस विक्री साठी आलेल्या इसमाला ताब्यात घेऊन अटक केली आहे, त्याच्या कडून सुमारे 13 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहबूब उर्फ पप्पू अब्दुलहक खान, (वय. 55 वर्ष, रा.आंबेडकर चाळ, बनेली, टिटवाळा, ता, कल्याण ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.तो भिवंडी शहरातील निजामपूरा परिसरातील रेशनिंग कार्यालयाजवळ मादक पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव,एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि धनराज केदार,पोउनि रविंद्र पाटील, सुधाकर चौधरी,पोहवा निलेश बोरसे,सुनिल साळुंखे,
वामन भोईर, साबीर शेख,सचिन जाधव,
रंगनाथ पाटील,सुदेश घाग,माया डोंगरे, उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांचेत्रविशेष तपास पोलीस पथक निर्माण करून सदर परिसरात सापळा रचून अंमली पदार्थ विक्री साठी आलेल्या अब्दुलहक खान यांस ताब्यात घेऊन त्यांच्या कडून सुमारे 13 लाख 5 हजार रुपये किमंतीचा 435 ग्रँम वजनाचा बाळगण्यात आलेला चरस जप्त केला आहे.या बाबतीत निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील करीत आहेत.
