भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात गेल्या काही महिन्यापासून विविध भागात सर्रासपणे मादक द्रव्य आणि चरस, गांजा विक्री केला जात असल्याचे तक्रारी ठाणे पोलीस आयुक्त यांच्या कडे जाताच अवैध धंदे करणाऱे समाजकंटक व्यवसायातील व्यक्तीं विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस दलास दिले.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत असुन भिवंडीत शांतीनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एका महिलेस शिताफीने ताब्यात घेऊन तिच्याकडून सुमारे 20 लाखाचा चरस जप्त करीत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
शबाना अन्वर कुरेशी (वय 39,रा.कसाईवाडा,
भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नांव आहे.गेल्या काही दिवसांपासून भिवंडी पोलिसांनी अवैध धंदे व्यवसाय करणाऱ्या विरोधात मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला ही चरस विक्री करण्यासाठी शहरातील अशोक नगर रस्त्यावरील पोस्ट कार्यालय समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिस पथकाने रात्री अकरा वाजताच्या सुमारास सापळा रचून या महिलेस ताब्यात घेत तिची अंगझडती तिच्या जवळ सुमारे 2 किलो 2 ग्रॅम वजनाचा 20 लाख 75 हजार रुपये किमतीचा चरस आढळून आला त्यामुळे पोलिसांनी सदरचा माल जप्त केला असुन शबाना हिच्या विरोधात एन.डी.पी.एस.अक्ट 1985 चे कलम 8 (क), 20(ब), (क), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहे.