शेअर मार्केट मधील परताव्याची अमिष दाखवून महिलेची 14 लाखाची फसवणूक, भिवंडीत गुन्हा दाखल

भिवंडी

 

भिवंडी ( प्रतिनिधी )सध्या ऑनलाईन वर अमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे पोलीस यंत्रणा सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहेत.असे असतानाच भिवंडीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळवून देऊन त्यानंतर अधिक परताव्याचा अमिष दाखवत एका महिलेची सुमारे 14 लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील बंगालपुरा परिसरात राहणाऱ्या मिनहाज ईशारद मोमीन ( वय 40) यांनी 12 जून रोजी MSFL connect नावाचे कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर मार्केटींग संदर्भात माहिती पाहत असताना ग्रुपच्या अँडमिन आरोपी शिवांगी अग्रवाल हिने संपर्क साधत 50 हजार गुंतवणूक करण्यास सांगितले.त्यामुळे सदर महिलेने बंधन बँक खात्यात 50 हजार पाठविल्या वर काही दिवसातच गुंतवणुकीवर 7 हजार फायदा मिळवून दिला.त्यानंतर सदर कंपनी कडून अधिक पैसे भरण्यासाठी सांगून 10 लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यावर 30 लाख रुपयांचा फायदा मिळवून देऊ असे सांगितले.तक्रारदार महिलेने 10 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक  केले  अवघ्या तीन दिवसात त्यांच्या ट्रेडिंग खात्यात 25 लाख रुपये 15 हजार 351 रुपये फायदा झाल्याचे दर्शविले.ते पैसे काढण्याचा प्रयत्न तक्रारदार महिलेने केला असता अग्रवाल या महिलेने सर्व्हिस कमिशन म्हणून आगावू पैसे मागणी केले त्यानुसार 3 लाख 64 हजार 212 रुपये त्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर ही रक्कम न मिळाल्याने फसवणूक करणाऱ्यांनी 5 लाख रुपये भरण्याची मागणी करीत फिर्याद मोमीन यांना वाँटशाप ग्रुपमधून काढून टाकले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सायबर क्राईम पोर्टलवर मोमीन यांनी तक्रार अर्ज केला त्याची दखल घेत भिवंडी शहर पोलिस ठाण्यात शिवांगी अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *