भिवंडीत संत नामदेव महाराज 675 वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) श्री.संत शिरोमणी
नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा आज मंगळवार दुपारी भिवंडी व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.या निमित्ताने सर्वत्र भजन,प्रवचन किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव आणि नागरिक उपस्थित होते.


 भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात सकाळी संजीवनी समाधीसोहळ्या निमित्त ह.भ.प.
भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार किर्तन सोहळा व महाआरती करण्यात आली.निमित्ताने शेकडो समाज बांधवांसह भाविकांनी संत नामदेव महाराज व विठ्ठल-रखुमाई मुर्तीचे दर्शन घेऊन महा प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष महेंद्र माडकर यांच्या हस्ते ह.भ.प.भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ठाणे जिल्ह्याचे जेष्ठ विधीतज्ञ अँड.नारायण अय्यर,महापालिकेचे माजी सभागृह नेते प्रशांत लाड,प्रदीप राका,निलेश आळशी,सिनेअभिनेत्री स्वाती कर्णेकर,अदित्य शेटे व नामदेव शिंपी फोरम सदस्य ठाणे यांच्या सह मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व शालेय विद्यार्थीचा गौरव करण्यात आला.भिवंडी व कल्याण,
डोंबिवली,ठाणे,वाडा,
पालघर,जव्हार सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातसह संजिवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शिंपी उन्नती मंडळाचे प्रमुख रविंद्र कालेकर,महेंद्र माडकर,
भानुदास भसाळे यांनी दिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद भसाळे ओंमकार लंगडे,जयेश हाबडे,ऋषीकेश कोपाडेँ, अदित्य चुटके,शेखर हाबडे यांच्यासह सदस्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *