भिवंडीत काँग्रेस पक्षाचे माजी 
नगरसेवकाचे गाडीची तोडफोड

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत लाड यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार वर मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने हातोड्याने हल्ला चढवीत नुकसान केले आहे.या धाडसी घटनेमुळे परिसरात
भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशांत लाड यांनी तातडीने  शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिरीष फडतरे व इतर तीन अनोळखी व्यक्तीं विरोधात तक्रार दिली आहे.या बाबत माहिती देताना प्रशांत लाड यांनी हा हल्ला पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.घराजवळ उभ्या असलेल्या कार वर  हल्ला करणारा शिरीष फडतरे हा ओळखीचा असून 10 मार्च रोजी प्रशांत हे अशोक नगर येथून रात्री साडेबारा वाजता आपल्या मोटार कारने घरी जात असताना समोरून चुकीच्या पद्धतीने कार घेऊन शिरीष फडतरे आला होता.त्यावेळी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन लाड यांनी त्यास समजावले होते.त्याचा राग मनात ठेऊन आपणावर हल्ला करण्याच्या इराद्याने त्याने घराजवळ उभ्या असलेल्या कार वर हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली.गाडी वर लोखंडी पारई ने झालेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला असुन याबाबत शांतीनगर पोलिसांना माहिती तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी झालेल्या घटनेची नोंद घेतली आहे.मात्र अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही.त्यामुळे लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असुन पोलीस उपाआयुक्तांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *