भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहर व ग्रामीण भागात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरण संपन्न झाला.या निमित्त शहरातील विविध शंकर मंदिर व श्री.रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन, प्रवचन,किर्तन सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.महाशिवरात्री निमित्त श्री.रामेश्वर चे पिंडाला अभिषेक करणे व दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.त्यामुळे परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी हरहर महादेव घोषणाबाजी व शंंखनाद करीत वाजतगाजत महादेवाचे प्रतिमेची पालखी काढण्यात आली होती महिलां सह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला,

महाशिवरात्री उत्सवा निमित्त महादेवाचे पिंडीस अभिषेक सोहळा करून महाआरती करण्यात आली.यावेळी मंदिर विश्वस्थ अध्यक्ष अशोक कुमार फडतरे यांच्यासह विश्वस्थ सुभाष माने,प्रशांत लाड,नगरसेवक संतोष शेट्टी, प्रविण पाटील,भरत सकपाळ,अशोक खामकर, मारूती देशमुख,डॉ.नुतन मोकाशी, शरद भसाळे,
रवी पाटील,सयाजी मोरे, अनिल फडतरे,भूषण रोकडे, मान्यवर पदाधिकारी,महिला व नागरीकानी दर्शन घेत खिचडी प्रसाद लाभ घेतला.
शहरातील खडबडेश्वर मंदिर,भिमेश्वर मंदिर,माकेँडे मंदिर,
शिवमंदिर,निळकंठ मंदिर काशी विश्वनाथ मंदिर तसेच राहनाळ, पोगांव दिंडीगड मंदिर तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्यावतीने येथे शिवपुजन कार्यक्रम करण्यात आला.
चौकट
भिवंडीतील दिवे -अंजूर येथील शिवमंदिराचा महाशिवरात्रीदिनी जीर्णोद्धार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील सपत्नी केली महापुजा केली.
कपिल पाटील यांनी उभारलेल्या या मंदिरात महा
शिवरात्री दिना निमित्ताने शेकडो महिला व नागरिक भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.