डी.वाय.फाऊंडेशन च्या माध्यमातून  10,12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दयानंद चोरघे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा भिवंडीत संपन्न..

भिवंडी

भिवंडी (शरद भसाळे) 10 व 12 वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीना शालेय उपयोगी वस्तू त्याचबरोबर शैक्षणिक दाखले,आधारकार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम डी.वाय.फाउंडेशनचे प्रदेशध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत भिवंडीत करण्यात आला,


यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व पालक वर्ग,जेष्ठ नागरिक,शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते
रायगड व  ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या डी.वाय.
फाऊंडेशनचे प्रदेशध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या पुढाकाराने दरवर्षी शालेय गुणवंत विद्यार्थीना वह्या,पुस्तके,गणवेश,छत्री त्याच बरोबर शासकीय शैक्षणिक दाखले शालेय उपयोगी विविध वस्तूंचे वाटप केले जाते यंदा सुध्दा हा कार्यक्रम त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी सरपंच दत्तात्रय सुतार,
संतोष काकडे,तुकाराम बजागे,योगेश जाधव, नारायण मोगरे,
अभिमन्यू पाटील,
भरत मढवी,नवनाथ सुतार,युवा नेते विरेन चोरघे,पत्रकार किशोर पाटील,तलाठी गणेश पाटील,फाऊंडेशन महिला प्रदेश अध्यक्ष प्रियंका चोरघे उपस्थित होत्या,


भिवंडी तालुक्यातील बापगांव – पडघा येथील कार्यालयात डी.वाय. फाऊंडेशन संस्थेचा 14 वा वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम करण्यात आला.भिवंडी तालुक्यातील पडघा,
आमणे-लोनाड रांजणोली,पिंपळास व सरवली परिसरातील दहावी व बारावीच्या 350 हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.तसेच ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिर व जैन रियालिटी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.जीवनात प्रगती करण्यासाठी चांगला अभ्यास व  सामाजिक कार्य करणे आवश्यक त्यातून प्रत्येकाला उत्तुंग यश प्राप्त होते असे मत यावेळी डि.वाय.
फाऊडेशनचे प्रदेशध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विरेन चोरघे,योगेश पाटील,
दीपक केणे मेहनत घेतली तर कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर तरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *