वक्त बोर्डाच्या राष्ट्रीय संयुक्त समितीचे अध्यक्ष खासदार जगदंअंबिका पाल यांनी भिवंडीत येत शिवसेना जिल्हाप्रमुखांची घेतली भेट

भिवंडी

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ.

भिवंडी (शरद भसाळे) उत्तर प्रदेशचे खासदार तथा वक्त बोर्डाच्या राष्ट्रीय संयुक्त समितीचे अध्यक्ष जगदंअंबिका
पाल यांनी नुकतीच
शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ. देवानंद थळे यांच्या भिवंडी कशेळी गांव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यामुळे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.मात्र अचानक भेटी साठी आलेल्या खासदारांमुळे पोलीस व शासकीय यंत्रणेची बंदोबस्त ठेवताना धावपळ उडाली होती.


शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून ओळखले जाणारे देवानंद थळे यांच्या घरी अचानक पणे उत्तरप्रदेश येथील खासदार जगदंअंबिका पाल यांनी सदिच्छा भेट देऊन विकास कामा संदर्भात मौलिक चर्चा केली.यावेळी सरपंच वैशालीताई देवानंद थळे यांनी परिवाराच्यावतीन जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रीयन पद्धतीने झालेला औक्षण
केल्याने ते भाऊक झाले होते. देवानंद थळे यांनी त्यांना विठ्ठल रखुमाईची आकर्षक मूर्ती देऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मनोभावे सत्कार केला. शिवसेना पक्षाकडे आकर्षित होऊन नुकत्याच काही खासदारांनी एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला त्यामुळे आता शिवसेना पक्षात येण्यासाठी बहुतांश आमदार व नगरसेवक सुद्धा इच्छुक झाले आहे,या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे असे असताना अचानक उत्तर प्रदेशातील खासदार जगदंअंबिका यांनी भिवंडीत येऊन शिवसेना जिल्हाप्रमुख थळे यांची भेट घेऊन गोपणीय चर्चा केल्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यां मध्ये
तर्क वितर्क व व चर्चा सुरू झाल्या आहेत.खासदार जगदंअंबिका हे वक्त बोर्डाच्या राष्ट्रीय संयुक्त समितीचे अध्यक्ष असल्याने शासकीय यंत्रणा सुध्दा अचानक दौरा भेटी मुळे चकीत झाली होती.
या भेटीची कुणालाच कल्पना नव्हती त्यामुळे ऐनवेळी शासन प्रशासन व पोलीसाची बंदोबस्त ठेवण्यासाठी धावपळ उडाली ही भेट निव्वळ कौटुंबिक स्वरूपाची असल्यामुळे तिची इतरांना कुणाला माहिती देणे योग्य नव्हते असे देवानंद थळे यांनी स्पष्ट करून होत असलेल्या चर्चेला विराम दिला.