भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहर काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आघाडी चे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जुने-नवे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यां मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली होती.त्यामुळे दोन्ही पक्ष कार्यकर्ते मध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती अखेर वरिष्ठ नेत्यांनी होती सुरेश (बाळामामा) म्हात्रे हेच राष्ट्रवादी महाविकास आघाडी चे उमेदवार राहतील असे सांगून भिवंडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षाच्या उमेदवारांचे काम करण्याचे सुचना दिल्या त्यामुळे भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष रशिद ताहीर मोमीन यांच्या पुढाकाराने भाजपाला शह देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेना एकत्र करून महाआघाडीच्या उमेदवार सुरेश (बाळामामा) म्हात्रे यांचे उपस्थितीत भिवंडी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या आवारात भव्य पक्ष कार्यकर्ता मेळावा घेऊन सुरेश म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन ,माजी नगराध्यक्ष रिजवान बुबेरे,प्रदेश कार्यकारणी सदस्य राकेश पाटील,अशोक पाटील, प्रशांत लाड,अँड.नियाज मोमीन,माजी अध्यक्ष प्रदीप पाटील,आरसी आझमी आदी मान्यवर उपस्थित होते. शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी सांगितले की ही पक्षाची निवडणूक नाही तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे त्यामुळे सतर्क राहून सुरेश म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करा असे आवाहन त्यांनी मार्गदर्शन भाषणात केले. तर राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळा म्हात्रे यांनीआपल्या भाषणात सांगितले कि, मागील दहा वर्षात खासदार कपिल पाटील यांनी कोणताही विकास केला नसून तानाशाही करीत केवळ टक्केवारीची राजनीती केली आहे,अशी टीका करून महाविकास आघाडीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
