उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला तिलांजली.????

भिवंडी

भिवंडीत पहाटेच्या सुमारास कल्याण रोड रस्ता रुंदीकरणासाठी मोजमाप व मार्किंग करण्यास पालिकेची सुरवात..

शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून केला विरोध..


भिवंडी ( प्रतिनिधी  )  भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम गत महिन्या पासुन सुरू झाले आहे.या अंतर्गत कल्याण रोड ते अंजूरफाटा  या रस्त्याचे रुंदीकरण काम केल्यानंतर भिवंडी महापालिका प्रशासनाने  कल्याण नाका ते टेमघर या दरम्यानचे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मालमत्ता वर मार्कीग व मोजमाप  करण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे.मात्र या  रस्ता रुंदीकरणास स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे.तसेच गत महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त प्रशासनाला थोडे सबुरीने घ्या असे सूचना करून रस्ता रुंदीकरण कार्यक्रम स्थगित करण्यास  सांगितले होते मात्र तरीही  आयुक्त प्रशासन कल्याण रोड  रस्ता रूंदीकरणा साठी मोजमाप व  मार्किंग करण्यासाठी आक्रमक झाल्याने नागरिकां मध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.


ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  पोलिसांची मदत घेऊन गुपचूप शनिवारी (दि.20) पहाटे चार वाजता भिवंडी कल्याण रोडवरील रस्त्यावर ३६ मीटर चे मोजमाप करून मार्किंग करण्यास सुरवात केली.यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका कर्मचाऱ्यांच्या दिमतीला सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सुमारे शंभर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैणात होता.
     पहाटे गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना या मोजमाप व मार्किगची माहिती मिळताच येथील तेथील बाधित मालमत्ताधारक नागरिकांनी एकत्र होऊन त्यांनी या मोजणीस घोषणा देत विरोध करण्यास सुरवात केली. कल्याण रोड संघर्ष समितीचे पदाधिकारी शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे,माजी नगरसेवक दीन मोहम्मद खान,शादाब उस्मानी,राम लहारे व नागरिकांनी कल्याण नाका परिसरात एकत्र होत त्यांनी पालिका कर्मचारी अधिकारी यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जमावाला व परिस्थिती शांत करून चर्चा करून या रस्त्यावरील बहुतांश मोजमाप व मार्किंग पूर्ण केले मात्र या घटनेमुळे नागरिकां मध्ये आयुक्त प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासन बेकायदेशीरपणे पोलिसांची मदत घेऊन रस्ता रूंदीकरण करीत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
   सकाळी चार वाजता या कल्याण रोड रहिवासी  झोपली असताना महापालिका जागी झाली आहे.येथील मालमत्ताधारक उपस्थित नसताना पालिका  ही बेकायदेशीर मोजमाप व  मार्किंग करीत आहे.प्रशासनाला प्रारूप विकास आराखडा मंजूर नसतात मोजमाप व मार्किंग करण्याचा अधिकार नाही.त्यास आमचा विरोध कायम आहे असा निर्धार संघर्ष समितीचे शादाब उस्मानी व उपस्थित रहिवाशांनी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दिवसा वाहतूक कोंडीचा त्रास यासाठी पहाटे लवकर ही मोजणी व मार्किंगचे प्रयोजन केले होते.पुढच्या टप्प्यात मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांना कायदेशीर नोटीस बजावून पुढील  कार्यवाही केली जाईल अशी माहिती आयुक्त अनमोल सागर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *