महापौरपदासाठी पक्षाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा महापौर कोण होणार यावर दररोज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत आहेत असे असतानाच भिवंडीत भाजपा पक्षामध्ये महापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी व मनपाचे माजी सभागृह नेते सुमित पाटील यांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.पक्षातील काही नगरसेवक हे सुमित पाटील यांच्यासोबत तर बहुतांश नगरसेवक हे नारायण चौधरी यांच्यासोबत असल्यामुळे भिवंडीत भाजपामध्ये सुरू असलेली गटबाजी उफाळून आले आहे असे असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी महापालिका महापौर पदासाठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांचे नाव शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्राद्वारे कळविल्याने शहराध्यक्ष सावंत यांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे.त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला.

दरम्यान सायंकाळी त्यांचे अभिनंदनाचे बॅनर सोशल मीडिया व व्हाटशाप समाजमाध्यमांवर झळकत शुभेच्छा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून महापौर पदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे जेष्ठ नगरसेवक सुमित पाटील समर्थकांनी सुमित पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असल्याचे बॅनर सोशल मीडिया व व्हाटशाप वर व्हायरल केले.
त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकी आधीच भाजप मध्ये दोन गट पडून गटबाजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे.
भिवंडी महापालिकेत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी १५ नगरसेवक माझ्या सोबत देव दर्शनाला बाहेर आहेत.त्यातच नारायण चौधरी हे निवडणुकी आधीच भाजप मध्ये दाखल झाले असुन भाजप नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा कशी करेल अशी प्रतिक्रिया सुमित पाटील यांनी पत्रकारांना दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्रावर जावक क्रमांक नसल्याने पत्राबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
लवकरच पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बाबत दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.महापौर पदाच्या निवडणुकी साठी पक्षाने अधिकृतपणे माझी नियुक्ती जाहीर केली असून त्या संदर्भातील लेखी पत्र देखील भाजप प्रदेश अध्यक्षांनी दिले आहे.त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी महापौर पदाच्या नावासाठी माझी अधिकृत घोषणा झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी दिली आहे.भाजप पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेवक नारायण चौधरी व सुमित पाटील हे दोघे ही इच्छुक असल्याने या बाबत निर्णय घेण्याची विनंती शहर पदाधिकारी यांच्या कडून प्रदेश कार्यालया करण्यात आली होती.भाजप प्रदेश कार्यालयाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणारे लेखी पत्र आमच्याकडे आले आहे.त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्व मान्य करतील अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष सावंत यांनी दिली आहे.
बहुमतासाठी भाजपाची धावपळ सुरू..
भिवंडी महापालिकेत भाजपाचे २२ शिवसेना (एकनाथ शिंदे ) १२ एक अपक्ष असे ३५ चे संख्याबळ आहे.
बहुमतासाठी आवश्यक ४६ ही संख्या पार करण्यासाठी महायुतीला ११ सदस्य कमी आहेत.त्यामुळे इतर पक्ष व आघाडीतील काही नगरसेवकांना सोबत घेऊन भाजप पक्ष भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आता धावपळ करीत असुन त्यांना कोणत्या पक्षातील नगरसेवक मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षीय बलाबल :- भाजप -२२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०,शिवसेना (शिंदे )१२, राष्ट्रवादी काँग्रेस(शप )-१२, समाजवादी पक्ष-६, कोणार्क विकास आघाडी-४,भिवंडी विकास आघाडी-३,

