भिवंडीतील लोनाड येथील गोदाम संकुल नाल्यात बिबट्या अडकला..

भिवंडी

पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू..

भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्यात मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सापळा घेऊन धाव घेत बिबट्या ला पकडण्या साठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.रात्री याच परिसरात बिबट्या आला असता आई एकवीरा ढाबा यांच्या सी सी टिव्ही कँमेरात चित्रण कैद झाले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकां मध्ये खळबळ माजली आहे.


          भिवंडी तालुक्यातील सावद लोनाड गांव परिसरातील पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील सडॉफेक्स कंपनीचे बस चालक दुर्गेश विश्वकर्मा हा या ठिकाणी बस मध्येच रहात असून शुक्रवार पहाटे पाच वाजताच सुमारास उठून नजीकच्या आई एकवीरा ढाबा येथे अंघोळ करून बस मध्ये जात असताना सहा वाजताच्या सुमारास ढाब्याच्या मागील बाजू कडून गुर्गुरण्याचा आवाज आला.त्याने लागलीच बस मध्ये धाव घेतली.त्यावेळी त्याला तेथून बिबट्या येत असताना दिसला.बिबट्या दोन गोदामांच्या मधील गल्लीतून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील नाल्या मध्ये अडकून पडला आहे.दुर्गेश विश्वकर्मा याने प्रसंगावधान राखत गल्लीच्या तोंडावर प्लायवूड लावून रस्ता बंद करून ठेवला असल्याने बिबट्या तेथून निसटू शकला नाही.अन्यथा सकाळच्या सुमारास त्याने नागरिकांवर हल्ला केला असता.दरम्यान आरडा ओरड करीत ही घटना ढाबा चालकास सांगितल्या वर सी सी टिव्ही कँमेरात तपासले असता ही घटना खरी असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर पडघा पोलिस व वन विभागाचे कर्मचारी सापळा व रेस्क्यू पथकासह दाखल झाले असुन वन विभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *