3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
भिवंडी ( प्रतिनिधी ) रायगड जिल्हयातील खोपोली व भिवंडी शहर परिसरात चोरी,घरफोडी करून पाणी वापरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रीक मोटर, एक्साईट कंपनीच्या बॅट-या व अँल्युमिनियम स्कॅप मालाची चोरी करणाऱ्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत दोघांना अटक केली आहे.त्याच्या कडून सुमारे तीन लाख 63 हजार 489 रूपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दुर्गेश उर्फ लाला श्रीराम निशाद (वय २२ रा.खोपोली) व महाजन रामसमुज यादव (वय. ३८ वर्षे रा.खोपाली जिल्हा रायगड) असे संशयित अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत. सदर इसमावर नारपोली,
निजामपूर, कोनगांव अशा विविध पोलीस ठाण्यात घरफोडी बाबतीत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नारपोली येथे दाखल असलेल्या एका घरफोडी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे उमेश ठाकुर हे करत असताना त्यांना आरोपी बाबतीत मिळालेली गोपनिय माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना दिली त्यामुळे त्यांनी
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहा.पो.उपनिरी. सुधाकर चौधरी, पोहवा यादव, वामन भोईर,जाधव, उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांचे पथकाची नियुक्ती करून सदर
पोलीस पथकाने संशयीत आरोपीत
दुर्गेश उर्फ लाला श्रीराम निशाद
व महाजन रामसमुज यादव या दोघांना खोपोली येथून ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.
पोलिसांनी त्यांच्या कडून पाणी पुरवठा साठी लागणाऱ्या 75 इलेक्ट्रीक मोटर, 2 एक्साईट कंपनीच्या बॅट-या,आणि अँल्युमिनियम स्कॅप चा भंगार माल
असा एकुण सुमारे तीन लाख 63 हजार 489 रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असुन अधिक तपास केला असता त्यांनी रायगड जिल्हा व भिवंडी परिसरात चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
