भिवंडी (प्रतिनिधी )महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा शेजारील पर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करून भिवंडी शहर ग्रामीण भाग परिसरात आणून त्याची गोदामात गुपचूप साठवणूक करून सदरचा गुटखा माल भिवंडी,कल्याण, मुंबई ,ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्हा परिसरात विक्रीत केला जात आहे.अशाच पद्धतीने परराज्यातून ट्रक मधून आणलेला सुमारे 40 लाख 80 हजार किमतीचा गुटखा व पंधरा लाख रुपये किमंतीचा ट्रक जप्त करण्यात नारपोली पोलिसांनी जप्त करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील सार्वजनिक रस्त्या वर एका कंटेनर मधून गुटखा वाहतूक करून आणला जाणार असल्याची खबर लागल्याने नारपोली पोलिसांनी रात्री 11:30 वाजता च्या सुमारास सापळा रचून कारवाई केली.त्या वेळी घटनास्थळी उभा असलेला कंटेनर क्रमांक KA 01 AJ 0959 ची तपासणी केली असता कंटेनर मध्ये शुद्ध प्लस पान मसाला सुपारीचे ३०० पॅकेट,च्युईंग टोबॅको,सुंगधी तंबाखु ६०० पॅकेट असा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आली.पोलिसांनी कंटेनर चालक शरीफसाब अब्दुलगौस सावनुर( वय ३२ वर्षे ) व इसाकअहमद अन्वरसाब निजामी (वय ३५ वर्षे दोघे राहणार कनार्टक )या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलीस अरविंद शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनगुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कडून 40 लाख 80 हजार किमतीचा गुटखा व 15 लाख रुपये किमतीचा कंटेनर ट्रक असा एकूण 55 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल. जप्त केला आहे.सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि.एल.राठोड करीत आहेत.
