आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा –भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात  येत्या म्हणजे सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे.त्यामुळे निवडणूक प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे.रविवारी  मतदान केंद्रावर सर्व मतदान पथके रवाना होणार आहेत. त्यामुळे आता मतदार यांची जबाबदारी आहे कि मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने आपले नाव कोणत्या केंद्रावर आहे, मतदान केंद्र कोठे आहे याची ‍माहिती आजच जाणून घ्या, यासाठी टोल  फ्री क्रमांक 1950 किंवा  भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या voter helpline app तसेच www.eci.gov.in या वेबसाईटवर आपले नाव निश्चितच आपणास मिळेल व  मतदान केंद्रावर जाणे सोईचे होईल असे आवाहन  भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय  अधिकारी संजय जाधव  यांनी  नागरिकांना केले आहे.निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन  महिन्यांपासून स्वीपच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले गेले असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे.आता वेळ आली आहे ती म्हणजे घराबाहेर पडून मतदान करण्याची प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होवून आपली लोकशाही बळकट करण्याची यासाठी आपण मतदानापूर्वीच आपले नाव शोधून ठेवले तर मतदान केंद्रापर्यत जाणे सोईचे होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहचणे सहज शक्य व्हावे यासाठी Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024  ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आले आहे. यामध्ये  23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या तीन लोकसभा मतदार संघासाठी स्वतंत्र क्यू आर कोड तयार करण्यात आले आहे. मतदार जर भिवंडी लोकसभा मतदार संघातील  असेल तर त्यांनी भिवंडी  लोकसभा मतदारसंघासाठी असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यावर भिवंडी मधील सर्व मतदान केंद्र दिसतील. त्यानंतर मतदारांनी मतदार स्लीपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे,किती अंतरावर आहे, तसेच मतदान केंद्राकडे कसे जायचे याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहचता येणार आहे.  

Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 ही बारकोड प्रणाली
 मतदाराला मतदान केंद्रापर्यत जाणे सहज सोपे व्हावे व सदरचे क्यू आरकोड हे मतदारांपर्यत पोहचावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर, तसेच व्हॉटसॲच्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील नागरिकांपर्यत विविध माध्यमातून सदर क्यू आर कोडची माहिती उपलब्ध केली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले. सोमवार दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून प्रत्येक नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावा असे आवाहन  भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी  यांनी केले आहे.मतदान करण्यासाठी आयोगाने भारत निवडणूक मतदार छायाचित्र ओळख पत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ग्राह्य धरल्याची माहिती. या निवडणूक प्रक्रियते ओळखपत्र नसलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांची कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींचे ओळखपत्र, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *