विद्यार्थ्यांना शैक्षणिक
वस्तू चे वाटप…
भिवंडी ( शरद भसाळे ) शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख व भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ.देवानंद थळे यांचा वाढदिवस ठाणे ग्रामीण जिल्ह्यात ” सेवा दिवस ” म्हणून शिवसेना पक्षाच्या व स्वराज्य सामाजिक संस्था माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्तेनी मोठ्या उत्साहात साजरा केला यानिमित्ताने ठाणे ग्रामीण भागात व शहर परिसरात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू,आरोग्य चिकित्सा शिबीर तसेच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमात देवानंद थळे यांच्या हस्ते स्नेहभोजन देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे वाढदिवसा निमित्ताने शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,लोकसभा गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,माजी खासदार आनंद परांजपे,आमदार शांताराम मोरे,उपनेते रूपेश म्हात्रे यांच्या सह भिवंडी शहर अध्यक्ष व ग्रामीण अध्यक्ष,भिवंडी मनपा नगरसेवक,कशेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या,वाढदिवस निमित्ताने शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांनी भिवंडी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वस्तू वाटपाचे कार्यक्रम ठीक ठिकाणी आयोजित केले होते, या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते ठीक ठिकाणी वाढदिवसा निमित्त केक वाटप करून त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमही करण्यात आला.देवानंद थळे यांचा वाढदिवस दरवर्षी “सेवाभावी ” दिवस म्हणून साजरा होत असतो.अशी माहिती पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील वडवली, वेहळे गांव, काल्हेर, कशेळी अशा विविध ठिकाणी असलेल्या शाळा व सभागृहात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देवानंद थळे व कशेळी गावचे सरपंच वैशालीताई थळे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीना वहया, पुस्तक, पेन,गणवेष,,छत्री,रेनकोट व दप्तर सारख्या विविध वस्तू व गरजू रूग्णांना धनादेश देण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये जाऊन स्नेहभोजन देण्याचा कार्यक्रमही करण्यात आला,सायंकाळी कशेळी येथील शिवसेना मुख्य कार्यालयात शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत देवानंद थळे यांनी केक कापून पदाधिकारी व कार्यकर्तेचे शुभेच्छा स्विकारल्या, यावेळी महिला संघटनेच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रम सूत्रसंचालन शैलेश मांजरेकर तर आभार प्रदर्शन निलेश यांनी मानले.

