भिवंडी ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवानंद थळे व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटपाचे कार्यक्रम ठीक ठिकाणी आयोजित केले जात असून या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते ठीक ठिकाणी वाढदिवसानिमित्त केक वाटप करून त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमही करण्यात आला.देवानंद थळे यांचा वाढदिवस दरवर्षी 30 जून रोजी “सेवाभावी ” दिवस म्हणून साजरा होत असतो.अशी माहिती पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील वडवली, वेहळे गांव कशेळी अशा विविध ठिकाणी असलेल्या शाळा व सभागृहात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देवानंद थळे व कशेळी गावचे सरपंच वैशालीताई थळे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीना वहया, पुस्तक, पेन,कपडे,छत्री, रेनकोट व दप्तर सारख्या विविध वस्तू व गरजू रूग्णांना धनादेश देण्यात आले.मंगळवार दि 30 जून रोजी सकाळी कशेळी येथील थळे यांच्या शिवसेना मुख्य कार्यालयात सुध्दा त्यांचा स्वागत समारंभ व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

